STORYMIRROR

Rupali Sapate

Romance

4  

Rupali Sapate

Romance

प्रेम

प्रेम

1 min
455

एक चांदरात मनाशी लपवून ठेवते मी..

पारिजात स्वप्नामधला जपून ठेवते मी..


उगाच का लागावी चाहुल कुणा प्रेमाची..

म्हणून हे पैंजणही काढून ठेवते मी..


किणकिण काकणांनी कशास ही करावी..?

बघ हातातला चुडाही सारून ठेवते मी..


गुलाबी चेहऱ्यावर या तुझ्या प्रेमाचे गोंदण..

कळ्या मोगऱ्याच्या तरीही माळून ठेवते मी..


सुगंधापरी दरवळावे प्रेम तुझे नि माझे..

अत्तराचे कितीक फाये लावून ठेवते मी..


घे ना जवळ मला तू सख्या असा दूर का रे..?

बेड्या परंपरेच्या बघ तोडून ठेवते मी..


विसरूनी माझे जग मी झाली तुझी दिवाणी..

तुझ्यासाठीच श्वास काही राखून ठेवते मी..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance