प्रेम
प्रेम
फुले सुगंधित माळतांना
नयनी तूच होता
आरश्या समोर सजतांना
हृदयी तूच होता..
पावसात चिंब भिजतांना
ओठीही तूच होता
पदर माझा सावरतांना
मनात या तूच होता..
मीच मला बघत होते
तुझिया नजरेतुन मला
प्रितीत तुझ्या धुंद होते
विसरूनी माझी मला
धुंद क्षणात रमतांना
स्पर्शातही तूच होता..
लाज अधरावर फुलतांना
स्वप्नी माझ्या तूच होता..
तूच माझे विश्व होते
होते ना तुजवीण काही
सरणावरही डोळ्यात माझ्या
फ़क्त सखया तूच होता...

