प्रेम
प्रेम
1 min
265
प्रेमाचा वारा,
उधाणला सख्या..
घेऊन चल ना मला,
परत विश्वात त्या सख्या..
नको ना दुरावा,
हा अंतरीचा असा..
बहरलाय बघनां,
वसंत प्रेमाचा ,
तोडून बंधने सारी
चल एक होऊनी
जाऊ सख्या ..
प्रेमाचा वारा
उधाणला सख्या..!!
नको ठेवू घुसमट
उरी अशी ,
नको विरहाची
तराणी जुनी..
चल ना गाऊ गीत,
प्रितीचे नव्याने सख्या..
प्रेमाचा वारा ,
उधाणला सख्या..!!
