STORYMIRROR

Rupali Sapate

Romance

4  

Rupali Sapate

Romance

प्रेम

प्रेम

1 min
324

धुंद तो अनं धुंद ती

बेधुंद आज आसमंत होता

बरसणाऱ्या श्रावण सरीत

न्हाऊन निघलेला देह होता ..


थेंब टपोरे झेलतांना

बहरलेला श्वास होता

ओठ अधिर ओठास

स्पंदनात काहूर होता ..


नि:शब्द होऊन भाव सारे

मूक्त होऊ लागले..

चिंब पावसात दोघे

मंत्रमुग्ध जाहले ..


सुगंधित या क्षणात

रोमांचित देह झाले

तृप्त नशेत दोघे

आज एकरूप झाले..


स्पर्शात भाव होते

स्पर्शाचे बोल झाले

रोम रोमी शिरला वारा

प्रणयास उधाण आले..


ज्वाला तमाच्या उठल्या

उष्ण अंग झाले..

ओसरल्या लाटा साऱ्या

देह चिंब चिंब झाले...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance