Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nalanda Wankhede

Romance

4  

Nalanda Wankhede

Romance

तो कोण होता

तो कोण होता

1 min
371


तो कोण होता

अलगद मला स्पर्शुन गेला

भविष्याची स्वप्न हातावर

माझ्या देवून गेला ।


स्पर्शाने त्याच्या गोंधळून गेले

फूलपाखरा समवेत बागडुन आले

जगात नविन पदार्पण केले

प्रेमाची भाषा शिकवुन गेला ।


तारुण्याच्या गर्कात न्हाहुन गेले

नव्हती वेळ तरी सावरून गेले

मारला डोळा लक्ष चुकवून

विश्वात त्याच्या गुंतून गेले ।


लळा त्याने लाविला मला

मेंदीच्या रंग खुलवून गेला

निरागस फुले शिंपुन

वेध मनाला लावून गेला ।


केला प्रयत्न विसरन्याचा

पण झाली पूर्णता भ्रांति

क्षणात लेक तुझी झाली परकी

वादळ वारा होवून सखा

पापण्या डोळ्याच्या कोर्ड्या करुन गेला ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance