प्रेम
प्रेम
1 min
437
तू असूनही सोबतीला
उणीव तुझी भासे क्षणोक्षणी
जसा चंद्र नभी असूनही
झुरते चांदणी मनोमनी.
स्पर्शात तुझ्या गंधाळली
सर्वस्वी माझी रे काया
तरीही का तुझी ओढ
निशीदिनी मना लागतीया.
शब्द मधाळ तुझे ते
कानी अविरत घुमती रे
पैंजणं रुणझुणता माझी
का मनात काही हलते रे.
संधिकाली देते चाहूल
चोरपावलांनी कुणी
भेदून माझ्या हृदयाला
तुझ्या आठवांची रे गर्दी.
झनकार उमटती असे
तुझ्याच आठवांचे मनी
मी माझीच नुरले आता,
प्रेमात रंगली तुझी साजणी.
