STORYMIRROR

Rupali Sapate

Romance

3  

Rupali Sapate

Romance

प्रेम

प्रेम

1 min
275

भास तुझा होता सख्या

काया माझी मोहरली

अधरावर बघ कशी

लाजेची लाली फुलली..


डोळ्यात माझ्या मखमली

स्वप्न असे सजलेले

धुंद धुंद या क्षणास

मनही वेडे आसुसले..


घालवूया क्षण साथीने

आजवर जे चुकलेले.

सोडवूया कारे कोडे..?

अजूनही न सुटलेले..


जोडून पाहू एक एक

धागे धागे तुटलेले

फुलेल कारे पुन्हा

फुल पाकळी मिटलेले..?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance