प्रेम
प्रेम
सये तुझ्या पाऊलांची चाहूल होता,
मनी मोरपिसारा फुलतो गं..
तुझ्या नाजूक ओठांची कळी उमलता,
रोम रोम माझा खुलतो गं..
गहिऱ्या तुझ्या डोळ्यांच्या वाटे,
माझा मी हरवून भुलतो गं..
नसते भान तू असता जवळी,
जीव उगाच तळमळतो गं..
स्पर्श तुझा मखमली होता सखे,
जीव बावरा दरवळतो गं..

