कसे सांगू तुला
कसे सांगू तुला
कसे सांगू तुला
जीव रे गुंतला
विणलेले जाळे
प्राण रे फसला
आधार माझा तू
दाखवीत वाट
प्रीत ही तुझी रे
सोन्याची पहाट
नजरेची भाषा
कानात गुंजली
शब्दाविना सख्या
प्रीत उमगली
सुख दुःख आले
परी ना हरले
वटवृक्षा वाणी
राया तू तारले
जन्माच्या साथीची
मज ग्वाही दे तू
बोलकी प्रीत ही
मिठीमध्ये ये तू
प्रियकर माझा
आहे अर्धे अंग
सावली माझी तू
चाले संग संग
प्रेमा तुझा धागा
काळीज शिवते
मोकळा हा श्वास
अंगी मोहरते

