प्रेम माझे कळेल कां तुला?
प्रेम माझे कळेल कां तुला?
आईबाबांची एकुलती एक लेक लाडकी
संपत्तीच्या हव्यासापोटी तू झाला स्वार्थी
मी तर भाळले कर्तृत्ववान तू पुरुष म्हणून
संपत्ती जीवनाची माझ्या तू उभी जाळली
हृदयाची स्पंदने होती तुझ्याच साठी
भावनेचा ओलावा ही तुझ्याचसाठी
जपली प्रीत मी करूनी अर्पण तुजला
मोहरले ना अंग तुझे कधी शिवण्या मजला
वरले तुला जीवनी हीच काय चूक झाली?
दिवसा मागून रात्र जाते, काया माझी क्षण क्षण जळते
धुंद सरीत पावसाच्या मी कोरडीच राहते
प्रेम माझे कधी कळेल का रे तुला?
साद मनाची कधीतरी ऐकू येईल कां तुला?
ओलित लाकडांचं धुसपुसन माझं
काळ्या काळ्या ढगांमध्येही नं बरसंन तुझं
हुंदक्यातील अश्रूंना वाट करून देते मोकळी
चैनीचं सावज फिरते घालून कुंतलाची चोळी
स्वार्थासाठी जरी बांधली रेशीम गांठ
दूर नको सारू साजणा मीचं तुझी सागरी लाट
स्वार्थ तुझा, निस्वार्थ प्रेम माझे एकजीव करू
फेसळलेल्या लाटेचं मधुर जीवनगीत गाऊं
फेसळलेल्या लाटेचं मधुर जीवनगीत गाऊं

