STORYMIRROR

SATISH KAMBLE

Romance

4  

SATISH KAMBLE

Romance

अनुभूती स्वर्गसुखाची

अनुभूती स्वर्गसुखाची

1 min
473

पावसात भिजलेले रूप तुझे ओले

बघून त्याला मन माझे हरवून गेले,

पावसाच्या सरींचे वस्त्र लेवूनी

अंग अंग राणी तुझे खुलून गेले


ओली चिंब होऊनी सामोरी तू आली

पाहूनी तुला माझी मतीच गुंग झाली,

थरथरत्या ओठांची भिजलेली लाली

बघून तिला जीव माझा होतो वर-खाली


नयनांवर पडलेले थेंब ते पाण्याचे

स्वप्न पाहिले त्यांनी मोती होण्याचे,

गळूनी गेले जेव्हा जमिनीवर खाली

दुःख अनुभवले त्यांनी संपून जाण्याचे


गगनात या जेव्हा वीज कडाडली

दचकून तू राणी मला बिलगूनी गेली,

मिठीत येताक्षणीच तू या हृदयाला

पृथ्वीवर स्वर्गसुखाची अनुभूती झाली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance