STORYMIRROR

Vasudha Naik

Romance Others

4  

Vasudha Naik

Romance Others

पहिली भेट

पहिली भेट

1 min
354

वसुंधरा गुलाबी थंडीने

हो फारच कुडकुडली

तप्त उन्हात पार

भाजून हो निघाली....


पाऊस आला अवचित

वसुंधरा आली खुशीत

पहिली भेट पावसाची

पावसाला घेतले कुशीत.....


वृक्ष, लता शहारल्या

पाऊस पाहायला डोकावल्या

पावसाचे दर्शन होताच 

त्याही छान सुखावल्या.....


पावसामुळे वसुंधरा सजली

हिरवाईने खूप छान नटली

पावसाची पहिली थेट भेट

वसुंधरा मनोमन लाजली......


सृष्टीतील सारेजणच

वसुंधरेवर प्रेम करती

हिवाळा, उन्हाळा, पावसाळा

जलचक्र फिरत राहती......


मानवा सांभाळून ठेव रे

सृष्टीचे हे चक्र अजब

जप जीवापाड हे देणं

दैवाने दिले ते कसब.....


निसर्गसंपत्तीचा र्‍हास 

मानवा तू नको करू

वसुंधरेवरील अनमोल ठेवा

आपण सदैव जतन करू....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance