जीवनसाथी
जीवनसाथी
येवो संकट वा कोसलो आभाळ
प्रत्येक क्षणी माझ्या सोबत राहती
माझ्या जीवनातील प्रत्येक सुख दुःखात
तीच तर स्वतःचे सुख दुःख पाहती
लागता ठेच चालताना मला या इथे
तीच साऱ्यात आधी धावून पुढे येते
तुम्हाला काही कळत नाही म्हणून
मला साऱ्या जगाचे ज्ञान क्षणात देते
समजून घेऊन सारे काही मनातले
स्वतः मात्र मनातच अव्यक्त असते
आईनंतर या जगात आपल्यावर
तिचेच तर निःस्वार्थ प्रेम असते

