STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Abstract

4  

Prashant Tribhuwan

Abstract

थोडे खरे बोलूया

थोडे खरे बोलूया

1 min
179

खूप झाले गोड - गोड बोलणे

चला आता थोडे खरे बोलूया

दडलेय जे या मनात अपुल्या

चला एकमेकांसमोर खोलुया


तिळाचा अन् गुळाचा गोडवा

शब्दातून वागण्यात आणुया

हसताना एकमेकांसोबत सर्व

त्यामागे लपलेले दुःख जाणुया


यशाचा पतंग उंच उडवताना

त्याची विश्वासरुपी दोर जपुया

ना तुटावा हा संबंध संस्कराशी

त्यासाठीचा मनी घोर जपुया


बस्स झाले हे देखाव्याचे जगणे

आता हृदयातून स्वीकार करूया

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर

एकमेकांची आपण साथ धरूया


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract