STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Abstract Inspirational

4  

Prashant Tribhuwan

Abstract Inspirational

काळोख

काळोख

1 min
487

आयुष्यात येत आहे काळोख

चला त्यावर आपण मात करू

सोडूनी देऊ राग, द्वेष, वासना

अन् सत् मार्गाची ही कास धरू


विसरले होतो उपकार केलेले

कर्तव्याची तर जाण न राहिली

कृतघ्न झालेल्या या जीवनात

पेटवू कृतज्ञतेची पणती पहिली


जर सोडला प्रयत्नवाद आपण

या काळोखात कसे दिसणार ?

सातत्याने केलेल्या कष्टाने मात्र

प्रत्येक वाट प्रकाशमय असणार


चला होऊ एक किरण सूर्याचा

अन् काढू काळोख जीवनातील

जागवू सर्व मिळून तो राम आता

आजच्या ह्या लाचार रावणातील


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract