वादळ वाऱ्यात मोडता मोडता
वादळ वाऱ्यात मोडता मोडता
डोळे पुसून हसयला
सयेबाई शिकलो मी
वादळ वाऱ्यात मोडता मोडता
तुझ्यामुळे टिकलो मी
या माणसांच्या जत्रेमध्ये
तसे नव्हते कोणी माझे
मरु आल्या स्वप्नाशी
तूच दिलेशी स्वास ताजे
निखार्याच्या रोज डागन्या
नव्हते सये फुंकर वारे
अंधारलेल्या दिशा दही
मावळल्याले चंद्रतारे
साहून साऱ्या उन झळाही
उन्हात हिरवे दिसायला
आयुष्यावर बोलत काही
नदी किनारी बसायला
सायेबाई शिकलो मी
वादळ वाऱ्यात मोडता मोडता
तुझ्यामुळे टिकलो मी
फुला पानांच्या नगरीमध्ये
रमला नाही जीव कोठे
मुक्या भनान गावामध्ये
कोंडल्या सारखा स्वास वाटे
धुंद टपोरे डोळे तुझे
ओठासंगे गोड हासले
भण भणणारे मन माझे
तुझ्या मध्ये गुंतून बसले
दुःखाचे नाव घाव ते
ह्र्दयावरूनी पुसायला
पडीक पडल्या आयुष्याला
पुन्हा नव्याने पुसायला
सायेबाई शिकलो मी
वादळ वाऱ्यात मोडता मोडता
तुझ्यामुळे टिकलो मी
ठावे नव्हते कृष्णइशारे
बसुरीच्या सुरामधले
डोळ्या मध्ये कसे कळावे
वादळ वारे उरामधले
राग द्वेष विसरून सारे
गाव प्रेमाचे वसायला
सुख शांतीच्या काठावरती
डोळे पुसून हसायला
सायेबाई शिकलो मी
वादळ वाऱ्यात मोडता मोडता
तुझ्यामुळे टिकलो मी

