STORYMIRROR

SIDHESHWAR MUNDHE

Others

4  

SIDHESHWAR MUNDHE

Others

परी

परी

1 min
436

आषाढाचे मेघ जणू बाल तिचे काळे

डोळ्यामदी काजळाचे साचलेले तळे

कोवळ्याशा ओठावर डाळींबाची फोड

नितळशा गालावर खळी फुले गोड

शोभिवंत तीळ उभा गोंदलेला गाली

अवतरली कोण परी आभाळाच्या खाली ॥


चेहऱ्यामंदी चंद्र तिच्या पुनवेचा छान

केवडाच अवतरला देह गोरापान

एक एक शब्द तिचा कोकीळेचा सूर

अत्तरात देह ओला गंध वाहे दूर

कुंकवाचा धनी तिचा असे भाग्यशाली

अवतरली कोण परी आभाळाच्या खाली ॥


Rate this content
Log in