सांगू कुणा
सांगू कुणा
व्यथा अधीर मनाची
सांगू कुणास कळेना
जीव चिंतेने ग्रासला
आता काहीच सुचेना.
देशासाठी लढण्यास
पोर माझा सैनकीत
शोर्य दावले तयाने
शूर वीर लढाईत.
काळ आला अचानक
झाला घायाळ लाडला
हाती शत्रुच्या गेल्याने
नाही कुणा सापडला.
हाच घोर माझ्या मना
व्यथा ग्रासते जीवास
जीव माझा तळमळे
सांगू आता मी कुणास.
वाट पाहते घरात
बाळ येई परतुनी
व्हावी भेट सोनुल्याची
देवा मागणे प्रार्थुनी.
