STORYMIRROR

Gaurav Daware

Comedy Fantasy Thriller

3  

Gaurav Daware

Comedy Fantasy Thriller

यम लईभारी.....

यम लईभारी.....

1 min
277

आज रात्री मी, 

होतो एकटा घरी 

निजलो होतो खाटावरी 

तर आवाज झाला दारी


दरवाजा उघडताच, 

मी झालो पसारी 

कारण दरवाज्या वर होता

 'यम' लईभारी 


आता मी पुरता घाबरलो 

घरात सैरावैरा पळत सुटलो 

घर होत मात्र एक रूमच

म्हणून पुन्हा दरवाज्यातच आलो 


यमाचं झाल घरात आगमन 

त्याला पाहून मेल माझ मन 

त्यांना पाहून घाबरली पंढरी 

वाटे पापाचा घडा झालाय भारी 


मी पहिले पाया पडलो 

मग थोडासा जोऱ्याने रडलो 

मला वाटल ऐकेल कोणीतरी 

पण शेजारी आमचे जोपलेय ढाराढूरी 


मग यमाला ऑफर दिली 

पैशाची थोडी मांडवली केली 

पण यम नियमांचा पुढारी 

माझी झाली फजिती सारी 


आता सुचली एक कल्पना भारी 

घरी होत्या दोन आजोबाच्या तलवारी 

झाली यमाशी लढण्याची तयारी 

यम होता विशाल अन मी चिरकूट धारी 


चालवली मी तलवार यमावरी 

तलवारीचे झाले तुकडे अन तारी

तुकडे हातात घेऊन जवळून पाहली 

त 'मेड इन चायना' चा ठप्पा तिच्यावरी 


चायना चा सारा माल बेकार 

तलवारी नाही टिकल्या फार 

आता नवीन युक्ती करायला 

झालो मी पुन्हा तयार 


मग आली आयडिया न कल्पना 

इमोशनल करू यमाले पुन्हा 

डोळ्यातून काढू थोड पाणी 

सांगू आपल्या दुःखाची वाणी 


यमाला म्हटलं "एका हो यम 

मायाजवळ न्हाय गर्लफ्रेंड बम

एकतरी मले पटवाची हाये 

त्याच्याआधी मी तुमच्यासंग येणार न्हाय "


माया थोबाडाकड पाहून 

त्याच्या डोळ्यात आलं पाणी 

म्या म्हटलं आता बसला 

आपला मंतर यमाच्या कानी 


 मग यम गेलो निघून 

माया घरातुन पटकन वाणी 

म्या सोडला मोकळा श्वास 

अन् झोपलो पुन्हा गूपचाप जाऊनी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy