आशेचा किरण
आशेचा किरण
का कवटाळलेस दुःखाला
का वाढवल्यास तुझ्या वेदना
आशेचा किरण असता सामोरा
का करतोस भूलथापांचा सामना
ठेव मनावर तुझ्या ताबा
अतिरेक आहे ठेवून दबा
मारू नकोस पोकळ सभा
हाच आहे यशाचा गाभा
विचार करायला शिक नव्याने
वाटा सापडत जातील
अडथळे दूर करत जा
यशाच्या नद्या वाहतील
वाईट विचारांचा निचरा होऊ दे
नव्या वाटांना जागा मिळेल
तुझ्यात दडलेल्या गुणांना
पुन्हा नवी आशा मिळेल
