जन्माजन्माची नाती
जन्माजन्माची नाती
सुखाने सोडले दारं, खुराडा राहुनी गेला.
विषाने साधुनी झोका, घृणाला खेळता केला.
कुणाचे कोणते वैरी, कुणाशी कोणते नाते.
निनावी खेळ हा दारी, असाही खेळला गेला.
धरूनी माझिया छाती, मुठीने घेरले दाते.
धगाने तापली भाती, उरीचा जाळला शेला.
प्रितीने तारली नाती, यमाने फेकता जाळे.
ऋणाने आपला भाता, मुठीशी आडवा केला.
जन्मा जन्माची नाती, मोहं ती कशी सुटावी.
पक्षी तोडतो पिंजरा, हा मार्ग आहे अकेला.
तिच्याच सोबत जगायला, फिरकुनि परत जीव आला.
होऊनि पुरताच वेडा, आयुष्ये सोडीत गेला.

