रौद्रावतारी पाऊस
रौद्रावतारी पाऊस
असा कसा रे कोसळलास रौद्रावताराने बरसलास
बरसलास नाही बरसतोयस
चुकली आहेत लेकरं माणसं म्हणून इतका का चवताळलास माणसांसोबत विचारही न करता गाई-म्हशी, पशु-पक्ष्यांचा
त्या बापड्या निष्पाप जीवांवरही कावलास
सगळीकडे पाणीच पाणी म्हणूनच दचकुन थांबले रे मी
अनेक स्टेशनांत अनेक रस्त्यांत रुळावरच रात्रभर रेंगाळले मी
मलाही झाला खूप त्रास म्हणून आहे तिथेच तशीच थांबले मी
त्याक्षणी लेकरं, बाया, माणसांना घेऊन थांबवून धरीले त्या प्रसंगी
तरीही आवरला नाहीस तू बरसतच राहिलास बरसतच राहिलास
रात्र सरली दिवस उगवला तसा तसा तू माझ्यातही शिरकाव केलास
खूप आटापिटा केला रे वाचवणाऱ्या मानवतेने
मी पाहात राहिले उघड्या डोळ्याने नाव नव्हते तुझे थांबण्याचे
प्रकर्षाने महालक्ष्मी नाव माझे मीही केला प्रयत्न माझ्या परीने
कोल्हापुरीत तू घालणार धिंगाणा किमान यांना तरी वाचवावे वाटले
खूप झाले आता हाल हाल सर्व ते
थांब थांब तू उभा राहा रे वैखरी
वाचू देत प्राण होऊ देत सर्व विळखामुक्त
येऊ दे तुला दया अनंता आतातरी
