STORYMIRROR

Vaibu Kumbhar

Tragedy Others

3  

Vaibu Kumbhar

Tragedy Others

नशिबाचा खेळ

नशिबाचा खेळ

1 min
1.3K

काय नशिबाचा खेळ

देह केलास तू हा खुळा

देवा देवा म्हणूनिया आता देह थकूनिया गेला

नाय शोभले र तुला आता प्राण हारूनिया गेला.


आधी सपाणं दावल, मग पोरखर केलं

काय पहातोस तरी, सार विस्कटून गेलं

या भीतीच्या खेळाणं, मन भांबावून गेलं

काय चूक ल र माझ, सारं भकास तू केलं.


कुठं लपलास तू देवा, माझ्या भक्तीला तू जाग

नाही हातात बळ, रहा पाठीच्या र माग

सार निष्ठुन जाईल, नको खेळुस हा डाव

पाय धरेन रे देवा नको काळजात घाव .


नाही मागत देवा ती सुखाची र खाणं

नको सोडूस तू आता सारे दुःखाचे र बाण

मी देवळात तुझ्या, दाव चरण र तुझ

सारं थांबव र आता, डोकं पायावर माझं.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy