सावर ग बाई.
सावर ग बाई.
काय वागणं ग तुझं
मोठ्या तोऱ्यात राहणं
थोडं सावर ग बाई
तुझं ठुमकत चालणं.
नको उघडी ती बेंबी
बसती डुक्कर ग सारी
नको इशारा तू देऊ
होशी ओसाड ग सारी
तुझा पदर झुलतो
कशी दिसते ग देखणी
नको पदर तू काढू
सारं जाईल चोरुनी.
साऱ्या सापांची नजर
तुझ्या रसाळ ओठात
नको देखावा तू करू
मोर नाचेल पाठीत.
