अमृतोत्सव
अमृतोत्सव


स्वातंत्र्याचा रम्य सोहळा
जयघोष करूया एक मुखाने
मातृभूमीचा राखूनी मान
तिरंगा फडकवू एकजुटीने॥१॥
गांधी,टिळक ,सावरकर
यांनी रचिला इतिहास
भगतसिंग, राजगुरू ,सुखदेव
यांच्या रक्ताचा मातीला वास॥२॥
देशभक्तीची मशाल पेटती
ठेवूया सदा तना मनात
पराक्रमाचे वारे वाहू दे
प्रत्येकाच्या सदा धमण्यात॥३॥
आठवावे शिवरायांचे साहस
लहान असो वा मोठा
स्वातंत्र्याच्या लढ्यात होता
साऱ्यांचा समान वाटा॥४॥
सुजलाम सुफलाम भारत
असे नररत्नांची खाण
बलिदानास देऊ त्यांच्या
मिळून साऱ्यांनी मान॥५॥