गावमातली माणुसकी
गावमातली माणुसकी


गावना माणसे, देखाडतस माणुसकी!
जव्हय भी जावो, तोंडभरी हाका मारतीन!!
चहा पे भो, पाणी पे भो!
जेवण करी जाय, अस सुद्धा म्हणतीन!!
कुणावर जर संकट ऊन, खेडामा जेवणंन ताटसुद्धा सोडी जातींन!
शहर मान तर कोणी मरि गय, तरी वाटे लावाले सुद्धा जात न्हतीन!!
जेवण काय कुणी पाणी बी पाजत नही!
रात बेरात ले काही मदत लागणी तर दरवाजाबी उघडावत न्हतीन!!
गावमा सण पावन ले एकमेकणा घर जातींन!
गोड धोड जेवन करतींन, आणि एक दुसराना घरसुध्दा देतीन!!
शहरमा
नवरा बायको एक ताटमा जेवतीन!
आणि खावा नन्तर , दोन्ही दोन कोपरासमा जाई सन व्हाट्स up खेतीन!!
गावमा खटला न घर राही, पण कधी आवाज यावं नही!
मिळी मिसळीसन खेती बाडी करतींन!!
सालमा एकसाव, जत्रानी शेव जिलबी खातीन!
आणी जत्रानी कुस्ती आणि तमाशा देखीसन मन रमाडतीन!!
म्हणशे जून ते सोन, म्हणून शहर मान चालस चुला नि मिसय!
तसच खेडानी संस्कृती सुद्धा शहरमा येवाले लागी!!
एकत्र कुटुंबनी पध्दत शहरमा बी पडी!
म्हणून म्हणस, गावनी संस्कृती खरच लई भारी, खरच लई भारी!!