वाचव रे देवा*वाचव रे देवा
वाचव रे देवा*वाचव रे देवा
श्रावण सरला, भाद्रपद आला…
साऱ्या महिला करणार आता हरितालिकेचा उपवास…
*जन्मोजन्मी हाच पती मिळो* साऱ्यांचे एकच मागणं असते खास...
रूढी आणि परंपरेचा पगडा इतका असतो ह्यांच्या मनावर...
की आपोआप हेच शब्द येती सगळ्या बायकांच्या ओठावर…
सगळ्यांच्या मनी विश्वास, नाही तरी तो आहेच भोळा शंकर...
एक मुखी मागणी ऐकुन सगळ्यांची, सहजच देऊन टाकेल त्यांना वर...
पण चाहुल लागताच याची, सारे पुरुष सावध झाले...
जमा झाले गणपती पुढे…
*घालीन लोटांगण* म्हणत त्यांनी घातले त्याला साकडे...
गणेश चतुर्थीच्या आधीच, हे काय नवीन? गणपती झाला चकित...
अभय देऊन म्हणाला, वत्सांनो, ऊठा, मला सांगा बरं स...गळं नीट...
सारे वदले धास्तावुन, आता तूच *वाचव रे देवा...*
तुझ्या भोळ्या पिताश्रींना दे आमचा ही सांगावा...
म्हणावं, या बायकांना वर देऊन आम्हाला नको देऊ शिक्षा...
पुन्हां पुन्हां का घेतोस तू आमची एवढी कठीण परीक्षा…?
एका जन्मातील मागण्या पुरवतांना ह्यांच्या, झालो आम्ही बेजार
मग कसा वहावा जन्मोजन्मी, या शिक्षेचा भार...
एवढ्या समाधानी नाहीत ह्या बायका, जशी देवी पार्वती...
नाना परीने छळतात, ह्यांना मुळीच नाही आमची क्षिती…
शिवाय गंमत म्हणजे स्वतःपेक्षाही जास्त दीर्घायुष्य मागणार…
मग आली का पंचाईत! पुढच्या जन्मी मी ह्यांच्यापेक्षा लहान नाही का होणार…?
तेव्हा…
दहा दिवस रोज देऊ तुला, ताटभर मोदक आणि दुर्वांच्या जुड्या एकवीस...
पण विघ्नहर्त्या, बाप्पा मोरया, आमचा एवढा हट्ट पुरव, जीव होतोय कासावीस...
नाहीतर असं कर... हरितालिके सारखं एखादं व्रत सुचव ना आम्हाला...
सारी शक्ती, नव्हे, भक्ती एकवटुन प्रसन्न करू आम्ही महादेवाला...
*बायकांची आणि आमची* दोघांचीही मागणी ऐकुन जर पडेल त्याला विचार...
आम्ही सांगु देवा... *तू तर आमच्याच पार्टीचा* मग करशील ना आमचीच नैय्या पार…!
*महत्वाची सूचना...सहज फक्त गंमत म्हणूनच वाचावं.*
