एका दिवसाची मजा
एका दिवसाची मजा
शाळेत असताना आमच्यासाठी
एक दिवस खूप स्पेशल असतो
कारण त्या दिवशी आम्ही
शिक्षकांचे रूप घेणार असतो
आवडत्या शिक्षकांंची नक्कल करुन
रुबाब दाखवत वर्गावर जातो
कारण त्या दिवशी आम्ही
शिक्षक झालेलो असतो
मनात थोडी भीती असे
पण खडू हाती असतो
मुले हसायला नको म्हणून
विचार करून शिकवितो
हजेरी घेताना डस्टर टेबलावर आपटत
शांत बसा सारखं सारखं म्हणणे
तेही वाटे आम्हांंला
न्यायालयातील ऑर्डर ऑर्डर करणे
तेव्हा एका दिवसात कळतो
शिक्षकांच्या डोक्याचा ताण
मात्र इतर दिवशी आम्हांला
बडबड करताना राहत नसे भान
शेवटी एकच..............
'शिक्षक' हे नाव दिसत असेल जरी छोटे पण खऱ्या आयुष्यातील त्यांचे स्थान असते खूप मोठे.
# thankyou teacher
