गूंता डा
गूंता डा
मानव जीवन किती असते गुंतागुंतीचे,
जन्मापासून तर मृत्यूपर्यंत असते गुंतागुंतीचे.
बाल अवस्था ते वृद्ध अवस्था पर्यंत असते,
अफाट नागमोडी डोंगरा इतके गुंतागुंतीचे.
न पेलनारा बंधनाचा डोंगर असतो हा गुंतागुंतीचा,
सांस्कृतीक, सामाजीक, पारिवारीक बंधनाचा.
एक- एक अवस्था असते जनु डोंगरी घाट,
कसा तरी काढवा लागतो यातुन पळवाटा.
या शोधात नेहमी प्रयत्न्शील असतो,
दुस-या अवस्थेत निघेल हा गुंतागुंतीचा काटा.
प्रतेक अवस्थेत घट होत जातो हा गुंताडा,
शेवटी लकक्षात येते जीवन आहे एक गुंताडा.
सुख-दुःख, प्रेम, भांडण, ईर्षा स्वार्थाने तू वेड,
यांचा हा सारखा गुरफट्लेला असतो गुंताडा,
सामान्य मानुस नाही धरु शकत बुध्दाची वाट,
मन मारुन धरावी लागते शेवटी वृध्द अवस्थाची खाट.
लहानपनात बघीतलेले तरुणाईचे थाट,
संसाराच्या ओझे लावते सारखी त्याची वाट.
सांस्कृतीक, समाजीक, राजकिय व आर्थीक कट,
लावत असते त्याच्या सुखी संसाराची सारखी वाट.
प्रत्येक क्षणाला असते इकडे विहीर तिकडे दरी,
जीवनात उंच उड्या घेवुनही बसतो आपल्याच दारी.
तरी प्रत्येक जन असतो आनंदीविलासाच्या शोधात,
शोध घेता –घेता गाठतो अंतिम जीवनाचा उंबरठा.
हे कटू सत्य समजते मनाला अंतिम क्षणाला.
वेळ निघुन गेली असते मन सावरायला.
