STORYMIRROR

Sachin Rane

Inspirational Thriller

3  

Sachin Rane

Inspirational Thriller

सन्मान नारीचा

सन्मान नारीचा

1 min
188

कोजागरी पौर्णिमेला घडली एक गोष्ट 

इतिहासाच्या पानांत दडली ही गोष्ट 

पाचशे वर्षांपूर्वी ही गोष्ट घडली 

रायगड होता तो गड हिरकणी उतरली 

दुध पोहचवण्या गेली होती ती गडावर

आज्ञा होती राजांची बंद करा गडाचे दार 

तिन्ही सांजेला झाले बंद कवाड


तानुल्याचा आठवला चेहरा तिला गोड 

भुकेने झाले असेल व्याकुळ तान्हे पोर 

विनवणी केली तिने किल्लेदारास थोर 

खोला कवाड जाऊ दयाना मज 


किल्लेदार म्हणे नाही , राजाज्ञा मज 

हिरकणी माऊलींने केले भलतेच धाडस 

उतरली तो बुरुज हिरकणी कळले, राजांस 

सत्कार करूनिया माउलीचा नाव दिले बूरूजास 

मातृत्वाचे काळीज, कळले जगास 


झाले नामकरण हिरकणी त्या बूरूजाचे 

इतिहासाच्या पानांत सुवर्ण अक्षरांचे 

सन्मान माउलीचा आणि मातृत्वाचा 

धाडसी नारींचा अन् मातांचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational