शहाणपणाचं ओझं...
शहाणपणाचं ओझं...
शहाणपणाचं ओझं पाठीवर वाहून नेताना
प्रशंसा करणारे शत्रू वाटायला लागले,
स्वतःला आरशात खोलवर पाहताना
स्व जिवंत असण्यावर आश्चर्य वाटायला लागले,
वेड्यांच्या जगात आपलं खरं ठरवताना
खोट्या हास्याची साथ हवीहवी वाटली,
स्वतःचं अस्तित्व टिकावं म्हणून स्व गहाण ठेवताना मी लोकांना बघितलं
मग आपल्या शहाणपणाचा पेटारा सोबत बाळगून मूर्ख होऊन जगनंच आवडायला लागलं.
म्हणे स्वतंत्र देशात स्वतंत्र होऊन जगण्याचा आनंद हा निराळाच सगळे सांगतात
मात्र अजूनही मान वाकवून गुलामापरी जगणारे माझी परिभाषा खोटीच ठरवतात.
साऱ्या जगाला खोटं ठरवताना मात्र शेवटी स्वतःचा खरेपणा सहन होत नाही
आरश्यालापण त्याच्या पारदर्शक असण्याचा गर्व सहन होत नाही.
