STORYMIRROR

Tushar Deshmukh

Abstract Inspirational

4  

Tushar Deshmukh

Abstract Inspirational

शहाणपणाचं ओझं...

शहाणपणाचं ओझं...

1 min
263

शहानपनाचं ओझं पाठीवर वाहून नेताना

प्रशंसा करनारे शत्रु वाटायला लागले,

स्वतःला आरशात खोलवर पाहताना

स्व जीवंत असन्यावर आश्चर्य वाटायला लागले,

वेड्यांच्या जगात आपलं छरं ठरवताना

खोट्या हास्याची साथ हवी हवी वाटली,


स्वतःचं अस्तित्व टीकावं म्हनून

स्व गहान ठेवताना मी लोकांना बघितलं

मग आपल्या शहानपनाचा पेटारा सोबत

बाळगून मुर्ख होउन जगनंच आवडायला लागलं.


म्हने स्वतंत्र देशात स्वतंत्र होऊन

जगन्याचा आनंद हा निराळाच सगळे सांगतात

मात्र अजूनही मान वाकवून गलामापरि

जगनारे माझी परिभाषा खोटीच ठरवतात.


सार्या जगाला खोटं ठरवताना मात्र

शेवटी स्वतःचा खरेपना सहन होत नाही

आरश्याला पण त्याच्या पारदर्शक

असन्याचा गर्व सहन होत नाही.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract