वास्तवाचे भान
वास्तवाचे भान
वास्तवाचे भान नाही,
हो उरले आता या जगाला.
त्यामुळे माणुसकीचा स्तर,
चाललाय रसातळाला.
राजकारणात चालते,
आप मतलबी खलबत्त्या.
वास्तवांच भान करतोय,
रक्ताच्या नात्याचीच हत्या.
गुन्हे, खून, बलात्कार, भ्रष्टाचार,
असंख्य राक्षसांचे स्वैराचार.
डोळे असून आंधळ्यांचा कारोबार.
वाढे ढिल्या कायद्याचा इथे व्यभिचार.
वास्तवाचं भान विसरल्याने,
महापूर, भूकंपाचा खातो फटका.
आधुनिकतेचा मिरवत झेंडा,
आरोग्यावर झेलतोय झटका.
कधी कधी वास्तवांच भान,
जनता जिरवे सत्ताधाऱ्यांची सत्ता.
बहुमत्ताने विजयी करण्याची,
लुप्त होत चालली मालमत्ता.
