मूलमंत्र सुखाचा
मूलमंत्र सुखाचा
माझी आणि त्याची
आज भेट झाली...
कधी नव्हे ते मी
त्याला आज पहिली।।
कोण आहेस तू?
विचारले त्याला.....
आरसाच तुझा
सांगितले मला।।
न राहून म्हणाले मी
ओळखले नाही तुला...
तुझ्यात आहे मी
समाधान म्हणतात मला।।
ऐकून त्याचे बोलणे
खुलून मी हसले....
हास्यातून माझ्या
रूप त्याचे दिसले।।
गेला तो भूतकाळ
आज आहे वर्तमान....
भविष्यासाठी रोज
होते ओढाताण।।
चार दिवस सरले
हिशेब उरल्या चाराचा...
समाधानी चित्त हाच
मूलमंत्र सुखाचा।।
