आयुष्य
आयुष्य
वातीकडून त्या शिकावं
कठीण परिस्थितीत कसं राहावं
कितीही आला वारा तरी तग धरून ठेवणं
अन् संघर्ष करुन स्थिर होणं
आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड करणं
अन् कितीही संकटं आली तरी संयम ठेवून लढत राहणं
आपल्या प्रकाशाने अंधार दूर करणं
अन् दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाशरुपी आनंद पसरवणं
असेपर्यंत तेल दिव्यात तेवत राहाणं
अन् नंतर शांतपणे विझून जाणं
त्या दिव्यातल्या वातीसारखंच
असतं माणसाचं आयुष्यही असंच
