STORYMIRROR

Dhanashree Mahajan

Inspirational Others

3  

Dhanashree Mahajan

Inspirational Others

..म्हणून मी लिहिते कविता

..म्हणून मी लिहिते कविता

1 min
264

कोणी वाचावी म्हणून नाही तर

माझ्याच प्रश्नांची उत्तरं मला मिळावी,

माझ्यातचं लपलेल्या विचारांना एक वाट मिळावी..

...म्हणून मी लिहिते कविता..◆


कोणाला आवडेल म्हणून नाही तर बऱ्या-वाईट

निर्णय-अनुभवांची जाणीव मला स्वतः रहावी,

त्या अनुभवांची दोर कायम बळकट रहावी,

पावलोपावली माझ्या स्मरणात राहावी

तर कठीण काळी स्वतःच्या विचारांनीच मला हिम्मत मिळावी

...म्हणून मी लिहिते कविता..◆


कवी बनावं प्रकाशित व्हावे म्हणून नाही तर,

गेलेल्या आयुष्यातील आठवणी माझ्या कवितेत साठवण राहाव्यात,

त्या क्षणांना आयुष्याच्या शेवटी आठवून जगता यावे,

तर जीवाच्या एकांतात माझीच कविता माझा सहारा बनावी,

...म्हणून मी लिहिते कविता◆


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન

More marathi poem from Dhanashree Mahajan

Similar marathi poem from Inspirational