STORYMIRROR

Seemarani Bagul

Inspirational

3  

Seemarani Bagul

Inspirational

जीवन गाणे गातच राहावे

जीवन गाणे गातच राहावे

1 min
394

जीवन गाणे गातच राहावे

झाले गेले विसरून जावे

नवीन वर्षाचे, नवीन हर्षाचे 

कास धरावे..

जीवन गाणे गातच राहावे...


जीवनात येती अगणित लढे 

संकटांचा सामना करत 

जावे पुढे...

दु:खामागुन सुखही येतात खरे 

रडत बसण्यापरी हसणे बरे...

जीवन गाणे गातच राहावे...


आज आहे उद्या नाही

जीवनाचे जाणावे मोल

मुखामध्ये शब्दांचे असावे 

गोड बोल...

कर्तृत्वाने मनुष्य होत असतो श्रेष्ठ 

सर्वांशी प्रेमाने वागावे

लहानमोठे वा असो जेष्ठ...

जीवन गाणे गातच राहावे...


काय होईल जीवन प्रारब्धात पुढे 

नाही कुणास ठाऊक पडते सर्वांना कोडे...

आज जगून घ्या तुम्ही आनंदात मस्त 

उद्याच्या विचारांनी नका करू

जीवन उद्ध्वस्त..

जीवन गाणे गातच राहावे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational