STORYMIRROR

M@nsi Gaikar

Inspirational Thriller

3  

M@nsi Gaikar

Inspirational Thriller

स्त्री शक्ती....

स्त्री शक्ती....

1 min
185

आयुष्याच्या वळणावर एक वेळ अशी येते.....

कुणी नसते कुणाचे मग जाणवते सगळे परके होते.......

पैसा अन् व्यसनाधीन जाणून संसार मोडून जाते...

स्वरक्षणास हिमतीने मग एक नारी दुर्गा होऊन पाहते ......

आमिषाच्या आहारी जाऊन होत्याचे नव्हते होते.....

विश्वासघातातून मग सावरतांना मनही विचलित होऊन जाते....

अति हव्यासापोटी मग भरलेल्या ओंजळीत हि 

खाली दर्पण मिळते.....

उदासीनतेची एक लहर मग सगळीकडेच पसरते....

समुद्राच्या लाटेसमान मग नको कुणीच आता 

असे मनास वाटे.....

दुखावलेल्या खोल भावना पाहुनी अगदी 

हृदय हि हळहळते .....

सहनशक्तीचा वसा मिरवून अंधारात अश्रू ढाळते .....

परिस्थितीचा सामना करून दुःख लपवीत 

ती स्मिथ हास्य आणते....

नको खचूस नको थांबू आता सांगून स्वमनास सांभाळते.....

एक स्त्री ही अशी असते जी सगळे सहन करते 

अन् फुलासमान बहरते.....✍️


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational