STORYMIRROR

M@nsi Gaikar

Romance

3  

M@nsi Gaikar

Romance

मला तो आवडतो आणि त्याला फक्त मी...

मला तो आवडतो आणि त्याला फक्त मी...

1 min
246

मला तो आवडतो आणि त्याला फक्त 

मी.....

मला पाऊस आवडतो त्याला पावसात मी....

मला फुले आवडतात त्याला फुलासारखी मी .....

मला हसायला आवडते त्याला गोड़ हसणारी मी ....

मला शांतता आवडते त्याला बोलकी मी....

मला लिहायला आवडते त्याला वाचणारी मी...

मला आनंद द्यायला आवडतो त्याला आनंदी मी..

मला स्वप्न पाहायला आवडते त्याला साक्षात मी...

मला रुसायला आवडते त्याला मनवणारी मी.....

मला खरं आवडते त्याला सिद्ध करणारी मी....

मला लांब केस आवडतात त्याला साधेपणात मी...

मला निळेभोर आकाश आवडते त्याला तारांकीत मी .......

मला ज्ञान वाटायला आवडते त्याला शिकवणारी मी...

मला वर्दी आवडते त्याला वर्दीत पाहणारी मी....

मला लहान मुले आवडतात त्याला खेळकर मी....

मला फिरायला आवडते त्याला सोबतीस मी....

मित्रांनो मला तो आवडतो आणि त्याला फक्त 

मी.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance