STORYMIRROR

M@nsi Gaikar

Tragedy Classics Thriller

3  

M@nsi Gaikar

Tragedy Classics Thriller

मार्ग सोपा आहे तु एकदा चालून तर बघ

मार्ग सोपा आहे तु एकदा चालून तर बघ

3 mins
116

मार्ग सोपा आहे तू एकदा चालून तर बघ…. 

प्रश्न तुझेही सुटतीन तू एकदा बोलून तर बघ…. 

उडता तुलाही येईन तू भरारी घेऊन तर बघ…..

साथ तुलाही देतील तू हाथ माघून तर बघ….

शूर तूही आहेस एकदा शुरतेनी लढून तर बघ….

संपले वाटतय ना सगळं एकदा सुरु करुन बघ…

सूर तुझेही जुळतीन एकदा गान गाउन तर बघ…

विजयी तुही होशीन पराजय विसरून तर बघ….

जग तुलाही दिसेन सारे डोळे उघडुन तर बघ….

माफ तुलाही करतील एकदा माफी मागून तर बघ….

अंधारातूनही उज्ज्वलित होशीन तू दिवा प्रज्ज्वलित 

तर करून बघ…

पुस्तक तूही लिहिशीन आधी लेखणी तर हाती घेऊन बघ…

योद्धा तूही होशीन आधी तलवार तर चालवून बघ…..

बाग तुझीही फुलेन आधी कळी तू उमलून बघ……

वकृत्व तूही करशिन शब्द तुझेही तू टाकुन बघ….

कलाकार तुही होशिन तुझी कला जोपासुन तर बघ….

कर्तृत्व तुझेही गाजणार थोडे क्ष्रम तू करुन बघ…..

घर तुझेही उभे राहीन तू मातीत पाय रोवुन तर बघ….

सुगरण तुही होशीन एकदा स्वयंपाक घर जाऊन बघ…..

वीरांगना तू होशीन तुझी वीरता ओळखून बघ….

सत्य तुझेच जिंकणार एकदा विश्वास ठेऊन बघ……

स्मरण तुलाही होईन एकदा तू स्वतःला आठवून बघ…

विखुरलेल्या आशा आकांक्षाना तुही जरा सावरून बघ….

शिखर तुही गाठशीन एकदा पायथ्याशी तर जाऊन बघ….

पुष्पगुच्छ ही तू होशीन आधी फुलांची पाकळी होऊन बघ….

आंगन तुझेही बहरेन तू रांगोळी तर रंगऊन बघ….

ताल तुझाही बसेन एकदा नाचुन तर बघ…..

सुंदर तुही दिसणार एकदा साडी नेसुन तर बघ…..

कळ्या खुलू लागतीन एकदा गजरा माळुन तर बघ….

वाऱ्याला तू साद घालशीन एकदा वादळ होऊन बघ….

एकतेचा परिचय घेण्या एकदा आवाज देऊन तर बघ….

प्रयत्नांची पराकाष्टा करुन सामर्थ्य तुझे दाखवून बघ…..

विजयाची तु साक्षीदार हो स्वतःला सिध्द करुन बघ….

करूनी सारे बघितले आरसा झालीस तू ओळखून बघ….

होते तुझ्यात जे विसरलीस तू एकदा स्वतःला जाणून बघ….

तुझ्याही कष्टाचे चीज होईन पुन्हा एकदा सुरूवात 

करुन तर बघ…..


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Tragedy