बाप
बाप
बापाचा नेहमीच राग येत असतो,
पण तो कोणालाच कळत नसतो
त्याचं फक्त ओरडणं दिसतं,
त्यामागचं प्रेम कळत नसतं
वेळेचं बंधन नेहमीच लादत असतो,
स्वतः काळजी करायची सोडत नसतो
बाप हा नेहमी झिजतच असतो,
तो सदानकदा लेकरांतच गुरफटत असतो
तनानं जरी तो दगड असतो,
तरी मनानं तो फूलच असतो
बघ जगून एक दिवस बापाचं आयुष्य,
मग समजंल तुला त्याचं भविष्य...
