गतसालाची देन
गतसालाची देन
2021 या वर्षाने मला काय दिले
जगण्यास दिले साहस
जिद्द अन् उभारी
दुःख यातना सोडुन सारी
घे आता भरारी !!१!!
ऊठ जरा आता
दुःख मिरवत बसू नको
आयुष्याचे रडगाणे
उगा गिरवत बसू नको !!२!!
रडायचं नाही आता
फक्त लढायचं आहे
अडथळ्यांची शर्यत जिंकून
यशोशिखर चढायचं आहे !!३!!
तू फक्त लढ
खचू मुळी नकोस
ढगाआड सूर्य असतोच
हे कधी विसरू नकोस !!४!!
दिला जरी अश्रूंचा महापूर
केले आप्तस्वकीय दूर
जप सोन्या सारिखी रे काया
अन् तुझ्या मुखाचा रे नूर !!५!!
महामारीचा काळोख रे दिला
किती हाहाकार माजविला
संग लसीकरणाचा
सोनेरी किरण ही दिला !!६!!
जगावं माणसासाठी च माणसानं
क्षणभंगूर असे रे जिण
जपू आप्तांचे तन अन् मन
शिकवलं हेच गत सालानं. !!७!!
