मानवा जागा हो
मानवा जागा हो
ईश्वरांना बनवली ही
सुजलाम सुफलाम सृष्टी
कर जतन फक्त मानवा
तुझी सुंदर ठेव दृष्टी !!१!!
रुजव बीज इतके तू की
धरती ही स्वर्ग होईल
अवनी चे हे रूप बघुनी
सृष्टी देवता नतमस्तक होईल !२!
पर्यावरण विध्वंसाची
तू जाण ठेव मानवा
नको करू कृत्य असे की
तुज कुणी म्हणावे दानवा !!३!!
भरभरून टाकलं त्यानं
पदरी तुझ्या माप
अवनीच्या त्या ऱ्हासाचं
का घेतोस माथी पाप !!४!
किती प्रगत म्हणे तू झालास
आकाश पातळी ही गेलास
स्वार्थापायी तुझ्या मानवा
घात सृष्टीचा केलास !!५!!
वदतोस वाणी तू भल्या माणसा
निसर्ग भारी कोपला आहे
आता तरी तू जागा हो
तूच खरा झोपला आहे !!६!!
असंख्य तरू च्या मुळाशी
तू घातलेस घाव
पवित्र सरिता गलिच्छ केल्या
असे तुला का ठाव !!७ !!
सारे मिळूनी शपथ घेऊया
समतोल पर्यावरणाचा राखूया
हातात हात घेऊनी
कोप निसर्गाचा थांबवूया !!८!!
