पूर्णत्व संकल्पाचे
पूर्णत्व संकल्पाचे
करू संकल्प मनी असा
जो तडीस नेता येईल
वसे अंतरी भाव असा
जो पूर्णत्वास नेईल !!१!!
गतसालाच्या जुन्या पुराण्या
जखमा सोडून देऊ
प्रेमाने अन् ममतेने
हातात हात हा घेऊ. !!२!!
राग लोभ अन द्वेषाची
करून टाकू होळी
रक्षण करण्या लेकींचे
चला करूया आपण टोळी !!३!!
व्यसनांच्या या विळख्यातली
चला शोधू या तरुणाई
सुंदर आयुष्य जगणे आहे
का मरणाची घाई !!४!!
बहरणाऱ्या लता तरू ची
जपवणूक ही करू
संगोपन जे करती त्यांची
साथ आम्ही ही धरू !!५!!
दीन दुबळ्या अन् दुःखिताना
आधार आम्ही देऊ
अनाथ कुणी लेकीच्या
जीवनाची पणती होऊ !!६!!
