STORYMIRROR

Usha Khandagale

Inspirational

3  

Usha Khandagale

Inspirational

सामर्थ्य ती चे

सामर्थ्य ती चे

1 min
142

ती नाजूक कोमल भासे

तिमिर छेदणारी वात असे

 काळोख संपवते 'ती '

इवलीशी पणती असे  !१!


पाठी घेऊन झोळी 

अनवाणी चालते 'ती '

रक्तबंबाळ चरण जरी

 तान्ह्याला सावरते 'ती ' !२!


खचला कधी भ्रतार असे 

तया सावरते 'ती '

खिन्न मनी तो जरी दिसे 

मनोमन घाबरते ' ती '  !३!


कोसळल्या जरी भिंती 

छत करीते पदराचे ' ती '

 वादळ वारे येवोत कितीही 

डगमगू न देते नौका कधी 'ती' !४!


कुटुंबाची नाळ जोडूनी 

रेशमात गुंफते 'ती '

काट्यांनाही फुले मानूनी

 परिधान ते हार बनवूनी 'ती ' !५!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational