नव्या वाटा
नव्या वाटा
गोड आठवणींचे हिंदोळे
करी ओले चिंब डोळे
सुख दुःखाचे सोहळे
पुन्हा नव्याने होवोत वेगळे !!१!!
नव्या वाटा,नव्या दिशा
स्नेह प्रेमाची ओढ नवी
मोह ना कसली आशा
सदा भेटीची आस हवी !!२!!
काळोखली जरी असे निशा
उमाळा अंतरी किती दाटला
आतुरल्या पुन्हा दाही दिशा
स्वप्नि हा मेळा पुन्हा भेटला !!३!!
सुखी सदा सर्वदा
असावेअवघ्यांनी
भावना अंतरीच्या सदा
जपाव्या सकळांनी !!४!!
सौ .उषा खंडागळे
घोडेगाव
