STORYMIRROR

Usha Khandagale

Inspirational

3  

Usha Khandagale

Inspirational

दोन्ही मुली

दोन्ही मुली

1 min
210

दोन्ही मुली झाल्या म्हणून 

नाक नका मुरडू 

गगन भरारी घेऊ आम्ही

 उंच उंच उडू. !!१!!


दिवा नाही झालो तरी 

पणती नक्की होऊ

माय बापाच्या आधाराची 

काठी आम्हीच होऊ !!२!!


नका उगी तिरसट बोलू 

 राग राग नका करू 

कार्ट्या झाल्या दोन्ही म्हणून 

डोक्यात राग नका धरू !!३!!


नाही झाला दिवा म्हणून का

ज्योती ला विझवायचं

दिवा दिवा करत फक्त 

डोळ्यांना भिजवायचं !!४ !!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational