STORYMIRROR

Kiran Gadhave

Inspirational

4  

Kiran Gadhave

Inspirational

गोंडा घोळत उभा आहे

गोंडा घोळत उभा आहे

1 min
41.6K


लाचार कुत्र्यासारखा तिच्याच मागे

आन् ती गूलुगूलू गप्पा मारण्यात दंग आहे

रंग लेऊन...

मानपान अन् भान हरवून रानभर हिंडतोय

तहान भागविण्यासाठी


ती मात्र गहान ठेवलेल्या दागिण्यासारखी वापरली जातीय नंबर लाऊन भोगविण्यासाठी..

आज याच्याकडे गहाण

उद्या त्याच्याकडे

या गहाण राहण्याच्या खेळात

आपण स्वतःच किती गहाण झालो

असा विचार येत असेल का?तिच्या मनात..


कदाचित तिनेसुद्धा पावित्र्याची

आन् चारित्र्याची चिंता

कधीच झटकून टाकलीय कुत्रीसारखी..


मुक्तभोग भोगून घेण्यात

स्वतःच सरावलीय का ती?

अतिपरिचयाने फिक्या वाटणाऱ्या माझ्यासारखच

तिला हे सर्व सरावाने फिकं वाटतय

कदाचित मानासहित....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational