STORYMIRROR

Kiran Gadhave

Inspirational Tragedy

3  

Kiran Gadhave

Inspirational Tragedy

कस वाटतय राजे

कस वाटतय राजे

1 min
27.4K


ब्रिटिशांच्या इमारतीसमोर

पहारेकरी म्हणून

उभे राहताना


वाईट वाटत राजे तेव्हा

जेव्हा तुमच्या पुतळ्यापायी

अन् ह्यांच्या राजकारणापायी

आमच्या निसर्गाची

पुरेपूर वाट लागते


इथ पुतळ्यांच्या संरक्षणासाठी

जिवंत माणसे ठेवावी लागतात

तुमचा पराक्रम आठवल्यावर

मरतुकड्या सेक्युरिटीकडे पाहून

काळजाचा ठोका चुकतो


कुठून तरी लाट येते

आन् वाट लावून जाते

राजे ज्या मावळ्यांना तुम्ही

ताठ मानेने जगाय शिकवल

ते आता नेभळट झालेत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational