का येत नाही मनात??
का येत नाही मनात??
का येत नाही मनात?
कच्च्या कैरीच्या आंबटपणातला
तो गोडवा
आता पूर्ण पिकून सुद्धा.
तू अशीच खूप सुंदर
दिसत असूनही
माझ्या मनात तुझ्याबद्दल
त्या भावनेचा एक पुसटसा
अंकुरसुद्धा
का जन्म घेत नाही?
तू जन्म देणाऱ्या पिलाच्या
कदाचित,रोमा-रोमात मी नसेन
पण मला माहित आहे
तुझ्यात माझा एक अंश
अजूनही बाकी आहे